Ad will apear here
Next
‘थॉमस कुक इंडिया’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी सुबोध भावे

राजीव काळे आणि अन्य अधिकाऱ्यांसह सुबोध भावे

पुणे : थॉमस कुक इंडिया या पर्यटन कंपनीने महाराष्ट्रातील सहलींसाठी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आता ‘थॉमस कुक इंडिया’च्या पर्यटकांना त्यांच्या युरोप सहलीदरम्यान आपल्या या आवडत्या कलाकाराशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.  

सिनेमाबद्दलची त्यांची मते, त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचा स्टार बनवण्याचा प्रवास अशा विविध विषयांवर सुबोध भावे पर्यटकांशी संवाद साधणार आहे.  
‘थॉमस कुक इंडिया’ने महाराष्ट्राच्या बाजारपेठेतून होणाऱ्या व्यवसायात २७ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, यात पुणे शहर आघाडीवर आहे. शिवाय, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी शहरांचाही वाटा आहे. मराठी बोलणारे, ग्राहकस्नेही आणि अनुभवी असे टूर मॅनेजर, मराठी खाद्यपदार्थांची, जेवणाची सोय, मराठी सहप्रवासी यामुळे युरोप, अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सहलींना मराठी पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

उपलब्धता आणि सोय या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिल्याने ‘थॉमस कुक इंडिया’ने महाराष्ट्रात सर्वत्र  विस्तार केला आहे. मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर अशा विविध शहरांमध्ये ४२ केंद्रे आहेत. एक विश्वासार्ह पर्यटन कंपनी म्हणून मराठी ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.    

थॉमस कुक इंडियाच्या हॉलिडेज, एमआयसीई आणि व्हिसा विभागाचे अध्यक्ष आणि कंट्री हेड राजीव काळे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायामध्ये झालेली २७ टक्के वाढ ही आमच्यासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. या भागातील आमच्या निष्ठावंत ग्राहकांना अधिक सेवा देण्यासाठी आम्ही सुबोध भावे यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे आमच्या ब्रँडचा संपर्क वाढू शकेल आणि ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव आणि अभूतपूर्व आनंद मिळेल.’

महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर सुबोध भावे म्हणाले, ‘दमदार वारसा जपणाऱ्या आणि भारतीय पर्यटकांसाठी प्राधान्यक्रमाची पर्यटन कंपनी असणाऱ्या थॉमस कुक इंडियासोबत जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. युरोप टूरदरम्यान माझ्या चाहत्यांशी संवाद साधण्यास मी उत्सुक आहे आणि त्यांच्यासाठी हा अनुभव संस्मरणीय व्हावा, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWECH
Similar Posts
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
‘गेटवे ऑफ इंडिया’ला ९५ वर्षे पूर्ण मुंबई : भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ला चार डिसेंबर २०१९ रोजी ९५ वर्षे पूर्ण झाली. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११सालच्या ऐतिहासिक भारत भेटीच्या स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले.
महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात धुक्याची चादर महाबळेश्‍वर : गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर गरम कपडे, शाली, स्वेटर्स, वूलनचे कपडे घालून फिरताना दिसत आहेत.
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language